भाजपच्या रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा
महाराष्ट्रात वन मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात सापडलेले असतानाच दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली आहे. नुकताच रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांची ही क्लीप समोर आल्यानंतर पक्षाची बदनामी टाळण्यासाठी जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रमेश जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे.
बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे. पोलिस चौकशीची आणि तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.