काम धंदा
Indian IT Industry : 50 हजार नोकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता! भारतीय IT क्षेत्रात ‘सायलेंट ले-ऑफ’; नोकऱ्यांवर धोका
'टीमलीज डिजिटल'च्या सीईओ नीती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 50 हजारहून अधिक भारतातील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे.
'टीमलीज डिजिटल'च्या सीईओ नीती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 50 हजारहून अधिक भारतातील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांसारख्या प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांनी आपल्या टीम्सची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे.
या कंपन्या ऑपरेशनल आणि तांत्रिक बदलांचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. आतापर्यंत टीसीएसनो 20 हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, त्याचसोबत इन्फोसिस आणि टेक महिंद्राने मिळून 10 हजारहून अधिक पदे कमी केली आहेत.