Bank Holidays 2026 : नव्या वर्षात बँकांना नेमकं कधी सुट्टी? २०२६ साठी बँक सुट्ट्यांची पूर्ण अधिकृत यादी जाहीर
• आरबीआयने २०२६ साठी बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली
• राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सणांमुळे बँका बंद राहतील
• दुसरा आणि चौथा शनिवार कायम बँक सुट्टी असेल
• डिजिटल व नेट बँकिंग सेवा मात्र सुरू राहणारथोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
नव्या वर्षाची सुरुवात झाली असून, अनेकांनी २०२६ साठी नवीन संकल्प केले आहेत. यंदा बँकेशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी नियोजन करताना बँक सुट्ट्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. अन्यथा ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता असते. आरबीआयने २०२६ साठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून, त्यानुसार राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिवस, महात्मा गांधी जयंतीसारख्या राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त महाशिवरात्री, होळी, बकरी ईद, जन्माष्टमी, ख्रिसमस, दिवाळीसारख्या सणांमुळे राज्यपातळीवर सुट्ट्या जाहीर होतात. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील, पण डिजिटल आणि नेट बँकिंग सुरूच राहील, ज्यामुळे ट्रान्झॅक्शन करता येतील.
२०२६ मधील प्रमुख बँक सुट्ट्या अशा आहेत: जानेवारीत १०, २४, २६ तारखा, फेब्रुवारीत १४, १५, २८, मार्चमध्ये ३, १४, २०, २८, एप्रिलमध्ये ३, ११, १४, २५, मे मध्ये १, ९, २३, २७, जूनमध्ये १३, २७, जुलैमध्ये ११, २५, ऑगस्टमध्ये ८, १५, २२, सप्टेंबरमध्ये ४, १२, २६, ऑक्टोबरमध्ये २, १०, २४, नोव्हेंबरमध्ये ८, १४, २८ आणि डिसेंबरमध्ये १२, २५, २६.
या तारखांना देशभरातील सर्व बँका बंद राहतील, तर स्थानिक सण आणि निर्णयानुसार अतिरिक्त सुट्ट्या असू शकतील. या सुट्ट्या लक्षात घेऊन आर्थिक व्यवहारांचे नियोजन करा, जेणेकरून नव्या वर्षात कोणताही त्रास होणार नाही.
• आरबीआयने २०२६ साठी बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली
• राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सणांमुळे बँका बंद राहतील
• दुसरा आणि चौथा शनिवार कायम बँक सुट्टी असेल
• डिजिटल व नेट बँकिंग सेवा मात्र सुरू राहणार
