Income Tax Return: 31 जुलैपूर्वी ITR भरा, तुम्हाला मिळतील 'हे' मोठे फायदे

Income Tax Return: 31 जुलैपूर्वी ITR भरा, तुम्हाला मिळतील 'हे' मोठे फायदे

तुम्ही तुमचा आयटीआर वेळेवर भरला तर तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. अनेकांना याच्या फायद्यांविषयी माहिती नाही, म्हणूनच आज आम्ही या फायद्यांविषयी सांगत आहोत.

Income Tax Return : प्राप्तिकर विभाग देशातील करदात्यांना ITR दाखल करण्यास वारंवार सांगत आहे. दंडाशिवाय रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. अशा परिस्थितीत वेळेत आयटीआर भरणे आवश्यक आहे. तुम्ही करदाते असल्यास तुम्ही ३१ जुलैपर्यंत तुमचे कर विवरणपत्र भरावे. तुम्ही अजून ITR भरला नसेल तर लगेच करा. जर तुम्ही तुमचा आयटीआर वेळेवर भरला तर तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात. अनेकांना याच्या फायद्यांविषयी माहिती नाही, म्हणूनच आज आम्ही या फायद्यांविषयी सांगत आहोत.

दंडातून सुटका

तुम्ही ३१ जुलै रोजी किंवा त्यापूर्वी तुमचे कर विवरणपत्र भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. जर तुम्ही वेळेवर ITR भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हा दंड 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकतो. ITR उशीरा भरण्यासाठी तुम्हाला व्याज देखील भरावे लागेल.

आयटीआर वेळेवर भरल्यास कर्ज मिळणे सोपे

बँकेचे कर्ज घेण्यासाठी आयटीआर भरावा लागतो. तुम्ही सातत्याने आयकर रिटर्न भरल्यास तुम्हाला बँक कर्ज सहज मिळेल. कर्ज घेण्यासाठी आयटीआर हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

त्यांना कर भरावा लागणार नाही

नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जुन्या कर प्रणालीमध्ये ही सूट 2.5 लाख रुपये आहे. हीच सूट 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 3 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com