Flipkart Freedom Sale : स्मार्टफोन, टीव्ही, एसी, फ्रीजवर जबरदस्त सूट ; जाणून घ्या

Flipkart Freedom Sale : स्मार्टफोन, टीव्ही, एसी, फ्रीजवर जबरदस्त सूट ; जाणून घ्या

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टचा सर्वात मोठा सेल; ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
Published by :
Shamal Sawant
Published on

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट लवकरच एक नवीन मोठा सेल घेऊन येत आहे. 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने ‘फ्रीडम सेल’ जाहीर केला असून, हा दिवाळीपूर्वीचा सर्वात मोठा सेल ठरणार आहे. यामध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर मोठ्या प्रमाणात सवलती मिळणार आहेत.

फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, एसी, फ्रीज यांसारख्या उत्पादनांवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. त्यासोबतच ‘फ्रीडम डील्स’, ‘रश अवर डील्स’, ‘बंपर ऑफर्स’ आणि ‘एक्सचेंज ऑफर्स’ही या सेलचा भाग असणार आहेत. सेलदरम्यान अनेक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 15 टक्क्यांपर्यंत सूट किंवा कॅशबॅकही दिला जाईल.

हा सेल 1 ऑगस्ट 2025 पासून केवळ फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी वापरकर्त्यांसाठी सुरू होणार असून, 2 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून तो सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुला होईल. सेल किती काळ चालणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर मोठे सेल्स आयोजित करण्यात येणार आहेत.

यंदाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 78 फ्रीडम डील्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या डील्सअंतर्गत ग्राहकांना काही निवडक उत्पादनांवर 78 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तथापि, यासंबंधी कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.प्लस आणि व्हीआयपी सदस्यांना या सेलमध्ये 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळणार असून, त्यांना सेलच्या एक दिवस आधीपासून खरेदीची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले अ‍ॅप अपडेट ठेवून सेलसाठी तयार राहावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

या सेलमुळे येत्या काही दिवसांत देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदीची लाट उसळण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, घरबसल्या विविध उत्पादने अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याचा योग लाभणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com