Share Market : शेअर बाजारात चिंतेचे वातावरण! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण

मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला असून सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स 873 अंकांनी तर निफ्टीही 24700 अंकांनी घसरला.
Published by :
Prachi Nate

मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला असून सलग तिसऱ्या दिवशी तो घसरणीसह बंद झाला. सुरुवातीच्या वाढीनंतर बेंचमार्क निर्देशांक घसरला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यापार दिवशी, बीएसई सेन्सेक्स 873 अंकांनी घसरला.

30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 872.98 किंवा 1.06 टक्क्यांनी घसरून 81,186.44 वर बंद झाला. त्याच वेळी, एनएसई निफ्टी 261.55 अंकांनी किंवा 1.05 टक्क्यांनी घसरून 24,683.90 वर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी घसरून 85.63 रुपयांवर बंद झाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com