वेदांताला झटका! महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर एका वर्षातच फॉक्सकॉनने गुंडाळला गाशा

वेदांताला झटका! महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर एका वर्षातच फॉक्सकॉनने गुंडाळला गाशा

सत्तातंरानंतर वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राज्यात रणकंदन पेटले होते.
Published on

नवी दिल्ली : सत्तातंरानंतर वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राज्यात रणकंदन पेटले होते. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्रही डागण्यात आले होते. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. फॉक्सकॉन कंपनीने वेदांतासोबतचा करार तोडण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉनने गुजरातमध्ये 19.5 डॉलर अब्ज गुंतवणुकीसह सेमीकंड्क्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन प्लांट स्थापन करण्याची घोषणा केली होती. फॉक्सकॉनने निवेदन जारी करून म्हंटले की, वेदांतासोबत फॉक्सकॉन आपले नाव काढून टाकण्याचे काम करत आहे. कंपनीने वेदांतासोबत संयुक्त उपक्रम न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नेमके कारण उघड झालेले नाही.

परंतु, त्यांनी वेदांतसोबत एक उत्तम सेमीकंडक्टर कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ काम केले. मात्र आता संयुक्त उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो प्रकल्प आता वेदांतची संपूर्ण मालकी असेल, असे फॉक्सकॉनने सांगितले आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनात नवे युग निर्माण करण्यासाठी भारताच्या आर्थिक धोरणाचा भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी चिप उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आता फॉक्सकॉनच्या निर्णयाने भारतात चिप्स बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या मोदींच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे. फॉक्सकॉन आयफोन आणि अॅपलची इतर उत्पादने असेंबल करण्यासाठी ओळखली जाते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com