Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी
आजच्या एकविसावे युग अर्थात AI च्या युगात आपल्या शिक्षणाबरोबरच काही विशेष कौशल्ये आत्मसात केली पाहिजे. जी कौशल्ये आत्मसात केल्यावर तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीनेही मोठा फायदा होऊ शकतो. आजकल काही कैशल्ये शिकण्यासाठी बाहेर जायची गरज पडत नाही. अनेक ऑनलाइन कोर्सेस आणि प्लॅटफॉर्म्स विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकवतात आणि त्या कौशल्यांच्या आधारावर कमाई करण्याची संधी देतात. यासोबतच, काही ॲप्स आणि वेबसाइट्स 'शिका आणि कमवा' योजना देखील देतात, ज्यात विद्यार्थ्यांना काही कामे पूर्ण करून किंवा अभ्यास करून पैसे मिळवता येतात. असेच एक मोठे नावाजलेले प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल होय. गुगल या जागतिक ब्रँडने मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु केले असून तुमच्या वेळेप्रमाणे ते करता येण्यासारखे आहेत. 100 टक्के ऑनलाइन आणि मोफत कोर्स असून ज्या कौशल्यांची विविध उद्योग क्षेत्रात जास्त मागणी आहे असेच कोर्सेस यामध्ये देण्यात आले आहेत.
गुगल त्यांच्या गुगल डिजिटल गॅरेज, कोर्सेरा आणि स्किलशॉप सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे अनेक मोफत कोर्सेस तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. यामध्ये डिजिटल मार्केटिंग,डेटा अँनालिटिक्स,आयटी सपोर्ट,प्रोजेक्ट मॅनेजमेंट,यूएक्स डिझाइन,पायथन फॉर एव्हरीबडी,सायबरसुरक्षा हे कोर्स तुम्हाला करता येणार आहेत. हे कोर्स केल्यानंतर गुगल सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला फ्रीलान्सिंग, रिमोट जॉब्स किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एक चांगली नोकरी मिळू शकते. मुळातच ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी काही कैशल्ये आत्मसात करावी लागतात.
कंटेंट रायटिंग
तुमचे भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्हाला लिखाणाची सवय असेल तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सुरुवातीला तुम्हाला यातून मिळणारे पैसे निश्चितच कमी असतील मात्र नंतर यामधून भरघोस कमाई करता येऊ शकते.
डिजिटल मार्केटिंग
हे एक असे कौशल्य आहे जिथे तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर सोशल मीडिया व्यवस्थापन, गुगल जाहिराती, ईमेल मार्केटिंग करू शकता. आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये जायची गरज नाही. तुम्ही हे घरबसल्याही करू शकता. यामध्ये फ्रीलांसर देखील महिन्याला 8-10 हजार रुपये कमावतात.आजकाल, उडेमी, कोर्सेरा सारख्या साइट्सवर डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
ग्राफिक डिझायनिंग
तुम्हाला डीझायनींग करता येत असेल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. कॅनव्हा, फोटोशॉप किंवा इलस्ट्रेटरचा वापर करून फ्रीलांस प्रोजेक्ट्स, लोगो डिझाइन, सोशल मीडिया पोस्ट्स, ब्रोशर, पोस्टर्स यासारखी अनेक कामे करू शकता. आणि यातून तुम्ही महिन्याला १० ते १५ हजार कमाई करू शकता.
तुम्हाला काय शिकायला आवडेल आणि कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल, हे ठरवून त्यासंबंधीचे कोर्सेस शोधून त्याद्वारे तुम्ही विविध कौशल्ये आत्मसात करून लाखोंच्या घरात कमाई करू शकता.