Gold Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना होणार फायदा
सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. सर्राफा बाजारात या मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली असून ग्राहकांसाठी ही संधी सोन्यासारखी ठरू शकते. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 603 रुपयांची घसरण झाली असून एक तोळा सोनं 98,414 रुपये झाले आहे. जीएसटीसह हाच दर 1,01,366 रुपये इतका आहे. चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले असून एक किलो चांदी 1,655 रुपयांनी स्वस्त होऊन 1,11,745 रुपयांवर पोहोचली आहे.
इतर कॅरेटमध्ये सोन्याचे दरही कमी झाले आहेत.
23 कॅरेट सोनं 600 रुपयांनी घसरून 98,020 रुपये झाले आहे.
22 कॅरेट सोनं 553 रुपयांनी कमी होऊन 90,147 रुपये (जीएसटीसह 92,851 रुपये) झाले आहे.
18 कॅरेट सोन्याचा दर 452 रुपयांनी घसरून 73,811 रुपये (जीएसटीसह 76,025 रुपये) झाला आहे.
14 कॅरेट सोनं जीएसटीसह 59,319 रुपयांवर पोहोचलं आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात 2,528 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदी 7,890 रुपयांनी महागली होती. मात्र, सध्या जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने दरात पुन्हा घसरण झाली आहे.
2024 च्या अखेरीस, म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोनं 75,740 रुपये आणि चांदी 86,017 रुपये किलो दराने उपलब्ध होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 22,674 रुपयांची आणि चांदीच्या दरात 25,728 रुपयांची वाढ झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात अधिक गुंतवणूक केली. त्यामुळे मागणी वाढल्याने दरातही मोठी वाढ झाली होती.
सध्या IBJA (इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन) नुसार 24 कॅरेट सोनं 98,414 रुपये प्रति तोळा आणि चांदी 1,11,745 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ खरेदीसाठी योग्य मानला जात आहे, मात्र जागतिक घडामोडींचा परिणाम दरावर पुन्हा होऊ शकतो.