Railway Government Jobs : तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी
सरकारी नोकरीची संधी जर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये एकूण 6238 पदांवर भरती पक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)ने RRB Technician Recruitment 2025 अंतर्गंत यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता तरुण बेरोजगारांना याव्दारे सरकारी नोकरीचा लाभ घेता येणार आहे.
रेल्वेमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध आहेत. भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून तांत्रिक क्षेत्रातील (technical) तरुणांसाठी विशेष संधी आहेत.एकूण 6238 टेक्निशियन पदांसाठी हे अर्ज मागवले जाणार असून टेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल) साठी 183 पदांवर टेक्नीशियन ग्रेड III पदांसाठी असे एकूण 6055 पदांसाठी हे अर्ज मागवले जाणार आहेत. यातील काही पदांसाठी 10 वी पास आणि आयटीआय (ITI) झालेले तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 जून म्हणजे आजपासून सुरु झाली असून 1 महिना अर्ज भरण्याचा कालावधी असणार आहे.
अर्जामध्ये काही चूक झाली असल्यास त्या चूका दुरुस्त करण्यासाठी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025 पर्यंतचा कालावधी दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला (rrbapply.gov.in) भेट देऊन हा अर्ज करता येणार आहे. रेल्वे भरती मंडळाने याबाबतची कार्यालयीन प्रक्रिया सुरु केली असून यामध्ये SC, ST, PwD, महिला, तृतीयपंथी, ईडब्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 250 रुपये अर्जाचे शुल्क असून इतर श्रेणींसाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना टेक्निशियन ग्रेड Iसाठी महगाई भत्ता, एचआरए, प्रवासी भत्तासह 29,200 रुपये इतके मासिक वेतन मिळणार आहे.तर टेक्निशयन ग्रेड IIIसाठी 19,900 रुपये इतके मासिक वेतन प्राप्त होणार आहे. संगणक परीक्षा , डॉकमेन्ट्स तपासणी आणि शेवटी फिटनेस टेस्ट या प्रक्रिया पार केल्यावर आणि CBT निकालाच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमुळे तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.