Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी नियोजनाचे महत्व
Published by :
Team Lokshahi
Published on

जीवनातील आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी आधीच त्याबाबत आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन आपल्याला आपल्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला आणि भविष्यातील आर्थिक अडचणींवर मात करायला मदत करते. आर्थिक नियोजन करणे म्हणजे फक्त पैसे वाचवणे नाही, तर त्याद्वारे भविष्यातील अनेक योजनांचे प्लँनिंग करता येणे यामुळे शक्य होते.

प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा त्यातून मार्ग काढणे कठीण होऊन जाते. त्यामुळे कधी कधी आपल्याला मानसिक नैराश्य येते. आणि आपल्या अधोगतीला त्यातूनच सुरुवात होते. मात्र अश्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची आधीच तजवीज करून ठेवली तर भविष्यात आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आपत्कालीन निधी,आरोग्य विमा,टर्म इन्शुरन्स अश्या विविध पद्धतींचा अवलंब करून आपल्याला आपले आर्थिक स्थैर्य राखता येते.

१) खर्चाचे आणि बचतीचे व्यवस्थापन करणे

२)गुंतवणूक करणे

३)बँकेत बचत करणे

४) अनावश्यक खर्च टाळणे

५)आपत्कालीन निधी तयार करणे

या काही गोष्टींचा योग्य विचार करून आर्थिक नियोजन केल्यास आपल्याला कधीही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या गरजा, इच्छा आणि भविष्यातील योजनांचा विचार करून आर्थिक उद्दिष्टे निश्चित करायला हवे. घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्तीसाठी बचत करणे या आणि अश्या गोष्टी साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.

आर्थिक नियोजन आपल्याला आपल्या खर्चाचे व्यवस्थापन करायला आणि बचत करायला शिकवते, ज्यामुळे आपण अनावश्यक खर्च टाळू शकतो. योग्य आर्थिक नियोजन आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला आणि आपल्या संपत्तीत वाढ करायला मदत करते. आर्थिक नियोजन आपल्याला अनपेक्षित घटनांसाठी (नोकरी गमावणे, आजारपण) तयार करतेआर्थिक नियोजन आपल्याला निवृत्तीसाठी पुरेसा निधी जमा करायला मदत करते, जेणेकरून आपण आपल्या निवृत्तीनंतर आरामात जीवन जगू शकतो. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com