Bank Recruitment 2024: परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची मोठी संधी; पाहा अर्ज कसा करायचा...

Bank Recruitment 2024: परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची मोठी संधी; पाहा अर्ज कसा करायचा...

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 जुलै 2024 आहे.
Published by :
Sakshi Patil
Published on

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. UCO बँकेत 544 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, त्यामुळे तुम्हाला विनापरीक्षा बँकेत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

अर्ज कसा करावा?

या जागांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनं करता येतील. यासाठी तुम्हाला UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.com वर जावे लागेल. निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख?

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 जुलै 2024 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 544 पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे प्रशिक्षणार्थी कार्यक्रमासाठी असून कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची वयोमर्यादा काय आहे?

20 ते 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क?

अर्ज करण्यासाठी शुल्क 1000 रुपये आहे तर आरक्षित उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

पगार किती मिळणार?

उमेदवाराची निवड झाल्यास दरमहा 15000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com