इच्छुकांसाठी सुवर्णसंधी! आरोग्य विभागात मेगाभरती

इच्छुकांसाठी सुवर्णसंधी! आरोग्य विभागात मेगाभरती

आरोग्य विभागात तब्बल मेगा भरती प्रक्रिया होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला वेग आला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आरोग्य विभागात तब्बल मेगा भरती प्रक्रिया होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

इच्छुकांसाठी सुवर्णसंधी! आरोग्य विभागात मेगाभरती
शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी

तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसमार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली आहे. मंगळवारी या भरतीची जाहिरात प्रसिध्द होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com