Maharashtra Talathi Bharti : राज्यात मोठी तलाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज
Maharashtra Talathi Bharti : सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात मोठी तलाठी भरती सुरु झाली आहे. तब्बल 4 हजार 644 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट - क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...
पात्रता
उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
पगार
माहितीनुसार, 25,500 - 81,100 वेतन देण्यात येईल. अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देण्यात येतील.
कसा कराल अर्ज?
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट mahabhumi.gov.in आणि अर्ज सादर करण्याच्या सूचनेसाठी mahabhumi.gov.in या लिंकवर क्लिक करा. संपूर्ण जाहिरात वाचल्यावरच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा. अर्ज सादर करण्याची 26 जून 2023 रोजीपासून सुरुवात होईल. तर, शेवटची तारीख 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षेची तारीख आणि कालावधी mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल.