NCERT Recruitment 2024: एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी...

NCERT Recruitment 2024: एनसीईआरटीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी...

भरतीसाठी इच्छुक असाल, तर तुम्ही ncert.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करा.
Published by :
Sakshi Patil

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) म्हणजेच एनसीईआरटीमध्ये (NCERT) नोकरीची उत्तम संधी आहे. एनसीईआरटीकडून भरती सुरु आहे, त्यामुळे तुम्हाला विनापरीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर तुम्ही ncert.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. एनसीईआरटी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 22 मे 2024 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात.

NCERT Recruitment 2024 : एनसीईआरटी भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 29 एप्रिल 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2024

NCERT Recruitment 2024 : भरतीसाठीची पात्रता

सीनियर रिसर्च एसोसिएट्स (SRA) : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी/उर्दूमध्ये 55 टक्के गुणांसह किंवा समतोल पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागात काम करण्याचा दोन वर्षांचा अनुभवही असावा. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा कमी असावी.

जेपीएफ (JPF) : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 55 टक्के गुणांसह हिंदी/उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com