Gas Cylinder Rates : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घट! व्यावसायिकांना दिलासा, जाणून घ्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत काय बदल?

Gas Cylinder Rates : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घट! व्यावसायिकांना दिलासा, जाणून घ्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत काय बदल?

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जुलै महिन्यात व्यावसायिकांसाठी सिलेंडरच्या किमतीत घट केली असून घरगुती सिलेंडरच्या किमतीत काय बदल केलेत जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जुलै महिन्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक संस्थांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती या 58.5 रुपयांनी कमी केल्या असून मुंबई, कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्लीमध्ये हे दर लागू केले आहेत. मात्र घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, भारतीय चलन रुपयाची स्थिती, बाजार परिस्थिती यावर एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरत असतात. त्यानुसार ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल केला असून तब्बल 58.5 रुपयांनी हा सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमती अपडेट करत असतात. त्यानुसार 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे.

यापूर्वीही 1 जूनला व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 24 रुपयांनी घट झाली होती. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधी 1674.50 रुपये होती आता ती 1616 रुपये इतकी झाली आहे. सध्यातरी कमर्शिअल LPG च्या दरात बदल करण्यात आला आहे . मात्र घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता मुंबई,कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्लीमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि ज्या व्यावसायिक संस्था अश्या व्यावसायिक सिलेंडरचा जास्त वापर करतात त्यांना या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com