Share Market Update : संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर रॉकेटसारखा वाढला 'हा' शेअर, अन् गुंतवणूकदारांच्या खिशात भरघोस फायदा
ट्रम्प यांनी लादलेल्या टेरिफनंतर भारतातील शेअर बाजारात आणि सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात उलथापालत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याचे भाव अचानक मोठी उसळी घेत गगनाला भिडले आहेत. तर शेअर मार्केटमध्ये देखील अनेक प्रसिद्ध शेअर्सचा भाव अचानक कमी झाल्याचे चित्र समोर आले आहे. अशातच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम असते. कधी तरी याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो तर कधी गुंतवणूकदारांना कपाळाला हात लावण्याची देखील पाळी येते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये कधी काय होईल हे सांगणे कठीण असते.
दरम्यान शेअर मार्केटमधून एक मोठी आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी हा शेअर रॉकेटसारखा वाढला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या युनिट असलेल्या ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीकडून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या शेअर्सची 26 कोटींपेक्षा अधिकच्या रकमेत मागणी करण्यात आली. जी डिसेंबर 2025 ते सप्टेंबर 2026 दरम्यान पूर्ण होणार आहे. या घोषणेनंतर 12 सप्टेंबर रोजी, पारसच्या स्टॉकमध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 694 चा विक्रमी उच्चांक गाठला.
पारस डिफेन्सने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत 15 कोटींचा नफा कमावला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ सारखाच राहिला. तसेच कंपनीचा महसूल वर्षानुवर्षे 11.5 टक्के वाढून 93.2 कोटींपर्यंत पोहोचला आहे, त्याचसोबत पारस शेअर्समध्ये एका वर्षात त्यात सुमारे 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यात सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 52 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
थर्मल इमेजिंग फायर कंट्रोल सिस्टम मध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालीसाठी पारस स्टॉकची ऑर्डर करण्यात आली आहे. तसेच ही ऑर्डर एका देशांतर्गत संस्थेकडून प्राप्त झाला आहे आणि संबंधित पक्ष व्यवहारांच्या कक्षेत येत नाही. अशी माहिती पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने दिली आहे.