2 हजार रुपयांच्या नोटांसाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत बदलता येणार

2 हजार रुपयांच्या नोटांसाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत बदलता येणार

2 हजारांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली : 2 हजारांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने 2 हजारची नोट बदलण्याची आपली अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती.

2 हजार रुपयांच्या नोटांसाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत बदलता येणार
'आदू बाळा', बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये...; शेलारांचा प्रहार

आरबीआयनुसार, 2 हजारच्या नोटा कायदेशीर राहतील. जर एखाद्या व्यक्तीकडे त्या 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या जवळच्या बँकेत किंवा आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन ते सहजपणे ते बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले होते. यात म्हटले की, चलनातून बाहेर काढलेल्या या नोटा आता 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत बँकांमध्ये जमा केल्या जाऊ शकतात आणि इतर नोटांसोबत बदलल्या जाऊ शकतात. 20 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या नोटा एकावेळी बदलता येत नाहीत.

दरम्यान, 19 मे 2023 रोजी आरबीआयने देशातील 2,000 रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली होती. बाजारात सध्या असलेल्या या नोटा परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, 31 ऑगस्टपर्यंत चलनात असलेल्या एकूण 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 93 टक्के नोटा परत आल्या होत्या. त्याच वेळी, सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com