Forest Department Jobs
Forest Department JobsTeam Lokshahi

Forest Department Jobs: वनविभागात तब्बल इतक्या जागांसाठी भरती; वाचा संपूर्ण माहिती

राज्याच्या वनविभागात 279 जागांसाठी भरती, आजच असणार अर्ज शेवटची तारीख
Published by :
Sagar Pradhan

मुंबई: अनेक तरूण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांत असतात. त्यातच आता महाराष्ट्र वन विभागात भरती निघाली आहे. वन विभागातील काही जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लेखपाल, सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ अभियंता – स्थापत्य, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. तर तात्काळ जाणून घ्या या पदांसाठी पत्रता काय असेल, या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

लेखपाल (गट क),

सर्वेक्षक,

उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब),

निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब),

कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब),

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क),

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

एकूण जागा - 279

प्रत्येक पदासाठी अशी असेल शैक्षणिक पात्रता

लेखपाल / लेखापाल (गट क):

मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

सर्वेक्षक:

12वी उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब):

माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी):

माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ज्यु. अभियंता सिव्हिल (Gr. B):

स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क):

गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क):

गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुला वर्गासाठी रु. 1000/- फी असेल तर राखीव वर्ग (सर्व): रु. 900/- इतकी फी असेल...

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जून 2023

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com