Stock Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला;निफ्टीतही उसळी

Stock Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला;निफ्टीतही उसळी

देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार घसरणीनंतर उसळला. सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स २६९.५२ अंकांच्या वाढीसह ८४,६७३.९८ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला

  • भारतीय शेअर बाजारात निफ्टी आज वाढीसह व्यवहार करत

  • काही मोठ्या नावांमध्ये नफावसुली पाहायला मिळाली आहे

देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार घसरणीनंतर उसळला. सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स २६९.५२ अंकांच्या वाढीसह ८४,६७३.९८ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील ६४.९५ अंकांच्या तेजीसह २५,९४२.८० अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. भारतीय शेअर बाजारात निफ्टी आज वाढीसह व्यवहार करत आहे.

बाजारातील या तेजीमध्ये प्रमुख योगदान देणाऱ्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, टीसीएस, टायटन कंपनी आणि एसबीआय यांचा समावेश होता. तर दुसरीकडे, काही मोठ्या नावांमध्ये नफावसुली पाहायला मिळाली आहे, ज्यात मॅक्स हेल्थकेअर, सिप्ला, एनटीपीसी, इंटरग्लोब एव्हिएशन आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज घसरणीसह खालच्या स्तरावर आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com