तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; असा तपासा निकाल

तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; असा तपासा निकाल

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. परिक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

Talathi Final Result 2023 : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. परिक्षेला बसलेले उमेदवार mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. निकाल कसा पहायचा ते जाणून घ्या....

कसा पाहाल निकाल?

- mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

- मुख्य पेजवर तलाठी थेट सेवा भरती-2023 जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या लिंकवर क्लिक करा.

- तुम्हाला एका नवीन पेज दिसेल तुम्ही जिथून परीक्षेसाठी अर्ज केला होता तो परिसर निवडा.

- तलाठीच्या निकालाची पीडीएफ स्क्रीनवर प्रदर्शित दिसेल.

- या यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर तपासा

- ही यादी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या

दरम्यान, तलाठी भरती परीक्षेसाठी दहा लाख ४१. ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४.९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली होती. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. तलाठ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. याचा आता अंतिम निकाल जाहीर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com