कंत्राटी पध्दतीने तहसीलदार नेमणे आहे; राज्य सरकारचा निर्णय

कंत्राटी पध्दतीने तहसीलदार नेमणे आहे; राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

पुणे : राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला होता. या जीआरला सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला होता. तर, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली होती. यानंतर आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयान ही जाहिरात काढली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तहसीलदार पदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीने भरली तर आम्ही करणार काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी सरकारला विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com