शेअर मार्केट म्हटलं की त्यात अनेकवेळा शेअर्स खाली किंवा वर जाताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळते त्यावेळेस बुल मार्केट पाहायला मिळतो, तर दुसरीकडे मार्केट घसरला की बिअर मार्केट पाहायला मिळतो. मात्र हे चिन्ह का दिले यााच कधी विचार केला आहे का? जाणून घ्या शेअर मार्केटमध्ये 'बुल' आणि 'बिअर' हे चिन्ह का निवडले?
शेअर मार्केट म्हणजे जिथे गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि विक्री करतात. शेअर मार्केट म्हटलं की त्यात अनेकवेळा शेअर्स खाली किंवा वर जाताना पाहायला मिळतात. या मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी अनेक एक्सचेंज आहेत, जसे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज.
ज्यावेळेस मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळते तेव्हा तो बुलिश आहे असे म्हणतात. बुलिश म्हणजे, उदा. बाजारात 20 टक्क्यांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा 20 टक्क्यांची किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढ होते तेव्हा त्याला बुलिश म्हणजेच बुल मार्केट म्हणतात. बाजारातील काही दिवसांच्या वाढीला बुल मार्केट म्हणत नाही. बुल मार्केटचा वापर शेअर बाजारासाठी केला जातो. मात्र ज्याठिकाणी खरेदी आणि विक्री होते तिथे त्याचा वापर केला जाऊ शकतो. उदा. बाँड, रिअल इस्टेट, चलन आणि कमोडिटी.
ज्यावेळेरस मार्केटमध्ये मंदी, वाढीव व्याजदर, ढासळण आणि घसरण असते त्यावेळेस बेअरिश ट्रेंड सुरू होतो. बेअरिश म्हणजे, जेव्हा अर्थव्यवस्था मंदावायला लागते तेव्हा त्याला बेअर बाजार म्हणतात. यावेळी मार्केटमध्ये निराशा असते आणि गुंतवणूकदार फक्त त्यांचे पैसे काढण्याचा प्रयत्न करतात.
बैल आणि अस्वलाची चिन्हे बैलांच्या झुंजीच्या परंपरेतून येतात. जर असं पाहायला गेलं तर बैल म्हणजेच बुल आणि अस्वल म्हणजेच बिअर हे दोघे ही सर्वात शक्तीशाली आणि तगडे प्राणी म्हणून पाहिले जातात. यात जेव्हा बैल कोणावर हल्ला करतो त्यावेळेस तो आपल्या शिंगावर त्याच्या शत्रूला घेतो आणि हल्ला करतो. तर दुसरीकडे अस्वल हा आपल्या शत्रूवर हल्ला करताना त्याला जमीनीवर पाडतो आणि खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. बैल शक्ती आणि आशावाद व्यक्त करतो, तर अस्वल त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करणे निराशावाद आणि संशयवादाचे प्रतीक आहे. ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये वर जाणारा ट्रेंड हा बुल मार्केट म्हणून म्हटला जातो. तर तोच ट्रेंड ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस त्याला बिअर मार्केट म्हटल जात.