भिवंडीत बालहक्क अधिकार जनजागृती रॅली संपन्न

भिवंडीत बालहक्क अधिकार जनजागृती रॅली संपन्न

Published by :
Published on

नोव्हेंबर बालदिना नंतर संपूर्ण सप्ताह बालहक्क अभियान जनजागृती म्हणून साजरा केला जात असून त्या अंतर्गत जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आणि भिवंडी महानगरपालिका महिला यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी शहरातील जिल्हा बाल परिवेक्षण गृह येथून पालिका मुख्यालय दरम्यान रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

रॅलीच्या प्रारंभी भिवंडी न्यायालयाच्या न्यायधीश कावळे, बाल परिवेक्षण गृहाचे मानद सचिव दिलीप कलंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस शुभारंभ झाला याप्रसंगी जिल्हा सुरक्षा अधिकारी बालकृष्णन रेड्डी, पालिका उपायुक्त नूतन खाडे, श्री साई सेवा संस्थेचे अध्यक्षा डॉ स्वाती खान सिंग उपस्थित होते. यारॅलीत परिवेक्षण गृहातील मुलींसह रेड लाईट एरिया व प्लॅटफॉर्म वरील बेघर मुलांचा समावेश होता त्यांनी बाल मजुरी, बालकांचे शिक्षण यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. महानगरपालिका मुख्यालयात या चिमुकल्यांचे महापौर प्रतिभा विलास पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com