काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वाद; अमित शहा सीबीआय चौकशी लावणार, नेमक प्रकरण काय ?
अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील (Chandrapur District Bank) गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर (Balu Dhanorkar) यांना दिले आहे. विशेष म्हणजे या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) यांचे वर्चस्व आहे. याच बँकेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी (CBI Inquiry) मागणी काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी केली होती. या मागणीची दखल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी घेत त्य़ांना चौकशीचे आश्वासन दिले आहे.
पदभरती घोटाळा व सतत सुरू असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Chandrapur District Bank) अनियमितता यावर कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहरात 13 मार्चला प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाबाबत व बँकेत सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराबाबत गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची खासदार धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी प्रत्यक्ष भेट घेतली.या भेटी दरम्यान शहांनी चौकशीचं आश्वासन खा.धानोरकरांना दिलं.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Chandrapur District Bank) काँग्रेस समर्पित संचालकांचे वर्चस्व आहे. असे असताना खा.धानोरकरांनी (Balu Dhanorkar) केलेल्या मागणीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. जिल्हा बँकेवर खासदारांची वक्रदृष्टी का पडली,याची चर्चा काँग्रेसचा गोटात सूरू आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Waddetiwar) आणि खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्यातील शीतयुद्ध सूरू असल्याचे बोलले जात होते.बँकेचा चौकशीची मागणी म्हणजे शीतयुद्धाचे तीव्र प्रतिसाद असल्याचे बोलले जाते. जिल्हा काँग्रेसमध्ये सूरू असलेल्या शीतयुद्धाचा लाभ उठविण्यासाठी भाजपा सरसावली आहे. धानोरकरांची सीबीआय चौकशीला वडेट्टीवार-धानोरकर वादाची पार्श्वभूमी आहे.राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्यात आले होते.त्यावेळीही धानोरकर-वडेट्टीवारांनी एकमेकांची उणीदूणी काढली होती.काँग्रेसमध्ये सूरू असलेल्या या शीतयुद्धात भाजपानेही उडी घेतली आहे.कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी भाजपाही सरसावला आहे.
काय आहे धानोरकरांची मागणी ?
राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे.या आधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले आहेत. बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.
विधानसभेत काय म्हणाल्या आमदार प्रतिभा धानोरकर
राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. परंतु आता पर्यंत संचालक मंडळ बरखास्त झाले नाही. त्याउलट दोन वेगवेगळ्या प्रकरणात ४२० कलमाचा आरोपी गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. हि बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी समिती गठीत करून प्रशासक नेमावा अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी विधानसभेत केली.