‘लोकशाही न्यूज’च्या कोरोना प्रीमियर लीगचा विजेता ठरला…
लोकशाही न्यूज नेटवर्क
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला. नंतर एवढा उद्रेक झाला की, तो नियंत्रणात आणण्याचे फार मोठे आवाहन सरकारी यंत्रणेसमोर होते. अशा वेळी सामाजिक जाणिवेचे भान राखत 'लोकशाही न्यूज'ने आगळ्यावेगळ्या 'सीपीएल' स्पर्धेची घोषणा केली. सीपीएल म्हणजे कोरोना प्रीमियर लीग! प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 'लोकशाही न्यूज'ने या स्पर्धेचा निकाल जाहीर करत विजेत्या टीमची घोषणा केली आणि या स्पर्धेत 'बुलंद औरंगाबाद'ने माजी मारली आहे.
कोरोनाबाबत जनजागृतीसाठी 'लोकशाही न्यूज'ने पुढाकार घेतला. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि रत्नागिरी या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या संघांचे प्रतिनिधित्व केले अनुक्रमे सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, देवदत्त नागे, पुष्कर श्रोत्री, अभिजीत खांडेकर, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, वैभव तत्ववादी, शिव ठाकरे आणि अपूर्वा नेमळेकर यांनी. 10 ऑक्टोबरला कोरोना प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा केली. त्यानंतर 50 दिवस म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होती. यात जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
'बुलंद औरंगाबाद' टीमने 5 लाखांचा पुरस्कार जिंकला आहे. पुरस्काराच्या ५ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालय, २ लाख रुपये औरंगाबाद महापालिका कार्यालय आणि एक लाख रुपये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाला देण्यात येतील. 'लोकशाही न्यूज' परिवाराकडून 'बुलंद औरंगाबाद' टीमचे अभिनंदन!