India
Corona Vaccination in India : देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस
कोरोनाने जगभरता धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनचा शिरकाव देखील झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर आज महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे आज लसीकरणाच्या मोहीमेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलं आहे.
आता बूस्टर डोसचे आव्हान आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती.
आतापर्यंत सव्वा तीन कोटी मुलांना लस देण्यात आली आहे. म्हणजेच, जवळपास 41 टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आली आहे. गेल्या सोमवारपासून बूस्टर डोस सुरू करण्यात आला आहे.