Daily Horoscope 15 June Rashi Bhavishya : 'या' तीन राशींनी आर्थिक व्यवहारात सावध राहावे

Daily Horoscope 15 June Rashi Bhavishya : 'या' तीन राशींनी आर्थिक व्यवहारात सावध राहावे

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य
Published on

मेष (Aries Horoscope Today) : चुकीचा संवाद टाळा. अनावश्यक खर्च होईल. तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. वस्तू हाताशी ठेवा. व्यवसायात आर्थिक अडचणी येऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची राहील. आरोग्याची चिंता संपेल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : कर्ज वसूल होईल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. आनंदाची बातमी समजेल. राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा. जबाबदारी वाढेल. तुमच्या वैचारिक कार्यात यश मिळेल. संधी हातून जाऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदाची शक्यता.

मिथुन (Gemini Horoscope Today) : नवीन योजना आखली जाईल. तुम्हाला समाजात सन्मान मिळेल. व्यवसाय यश मिळेल. कुटुंबाची चिंता राहील. घर, वाहन खरेदीचे योग येतील. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदारांकडून सहयोग मिळेल.

Daily Horoscope 13 June

कर्क (Cancer Horoscope Today) : उपासनेत आवड निर्माण होईल. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. लाभाच्या संधी येतील. व्यवसायातील योजनांमध्ये प्रगती होईल. वेळेचा सदुपयोग कराल. थांबलेले पैसे तुम्हाला मिळतील.

सिंह (Leo Horoscope Today) : प्रवासात काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील. संभाषण, वागणूक, निर्णय गुप्त ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील. अनावश्यक खर्च होईल. संध्याकाळ कुटुंबासोबत घालवाल.

कन्या (Virgo Horoscope Today) : विवाहाचा प्रस्ताव प्राप्त होऊ शकतो. सरकारी कामे होतील. शारीरिक त्रास संभवतो. व्यवसाय चांगला राहील. मुलांच्या कामात असंतोष राहील. मित्रांसोबत मतभेद होतील. सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल. यामुळे मानसिक तणाव जाणवेल.

तूळ (Libra Horoscope Today) : आशा-निराशा दिवस असेल. जमीन आणि इमारतीशी संबंधित अडथळे दूर होतील. तुम्हाला रोजगार मिळेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या खर्चावर आणि व्यवहारांवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : पार्टी आणि पिकनिकचा आनंद लुटता येईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबात शुभ घटना घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित प्रगती होईल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : चिंताग्रस्त दिवस असेल. दु:खद बातमी मिळू शकते. वाद घालू नका. जास्त मेहनत, कमी नफा. यामुळे मन उदास राहील. कुटुंबात वादाचे वातावरण राहील. प्रकृतीची काळजी घ्या. उद्धटपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरेल.

मकर (Capricorn Horoscope Today) : अडचणींचा दिवस. पण, प्रयत्नांनी यश मिळवता येईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय समाधानकारक स्थिती. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वैचारिक मतभेदाची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : आर्थिक लाभ होईल. इतरांच्या भांडणात पडू नका. अध्यात्म आणि विज्ञानात रुची वाढेल. नोकरी, राजकारणात नशिबाची आजमवल्यास यशाची शक्यता. घरामध्ये शुभकार्य ठरतील. जुने मित्र भेटतील. आनंदाचे वातावरण असेल.

मीन (Pisces Horoscope Today) : व्यवसायानिमित्त प्रवास होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. आर्थिक प्रगती. भागीदारी व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. तरुणांना संधी चालून येतील. संधीचे सोने करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com