Deepak Kesarkar : महायुतीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं सरकार पुन्हा सत्तेत यावं
थोडक्यात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान
दिपक केसरकर यांनी केलं मतदान
मतदान केल्यानंतर दिपक केसरकर यांनी दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर दिपक केसरकर म्हणाले की, सावंतवाडीकरांचे प्रेम आणि विश्वास मला नेहमी मिळालेला आहे. त्याच्यामुळे सातत्याने माझा विजय होत असतो. मागच्यावेळीची लढाई अधिक कठीण होती. कारण ती शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई होती. आता तर शिवसेना आणि भाजप एकत्र आहे आणि सावंतीवाडीकरांचा विश्वास आहे.
अनेक रेकॉर्ड हे सावंतवाडीच्या जनतेनं बनवले आहेत. सावंतवाडीमध्ये सतत दोनपेक्षा अधिक काळ कोणी निवडून येत नाही. असा जो लोकांच्या मनामध्ये समज होता तो यानिमित्ताने तिसऱ्यावेळा जिंकून तो त्याठिकाणी एक रेकॉर्ड झालेला होता. महायुतीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं असं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावं.
यासोबतच ते म्हणाले की, लीड हे नेहमी जास्त होत जाते. यावेळी ते लोकसभेपेक्षा अधिक कारण मागच्यावेळी लोकसभेला मिळालेल्या मतांपेक्षा अधिकचं मताधिक्य हे मला मिळालेलं होते. तसंच यावेळीसुद्धा मिळेल. विजय हा विजय असतो तो कितीही मताधिक्यांनी झाला तरी तो विजय असतो. असे दिपक केसरकर म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: