Delhi Assembly: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी 'चलो दिल्ली'! 11 उमेदवारांसह पहिली यादी जाहीर

Delhi Assembly: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी 'चलो दिल्ली'! 11 उमेदवारांसह पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांसह पहिली यादी जाहीर केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राजधानी दिल्लीतील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

विधानसभा निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजधानी दिल्लीतील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीत साधारण फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान दिल्लीतील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी शनिवारी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढविल्या होत्या. त्यामुळे शनिवारी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या यादीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

उमेदवारांची नावे जाणून घ्या...

1. बुरारीमधून रतन त्यागी

2. बदलीमधून मुलायम सिंह

3. खेम चंद - मंगलोपुरी

4. खलिदुर रहमान - चांदनी चौक

5. मोहम्मद हारून - बल्लीमारन

6. नरेंद्र तन्वर - छतरपूर

7. कमर अहमद - संगम विहार

8. इम्रान सैफी - ओखला

9. नमाहा - लक्ष्मीनगर

10. राजेश लोहिया - सीमापुरी

11. जगदीश भगत - गोकुळपुरी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com