केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर; नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ

केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर; नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ

Published by :
Published on

दिल्लीत नायब राज्यपालांचे अधिकार वाढवण्याशी संबंधित विधेयकावरुन आम आदमी पक्ष आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (सुधारणा) विधेयक 2021 लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं.

दरम्यान, यामध्ये नायब राज्यपालांना जास्तीचे अधिकार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती कोविंद यांनी रविवारी या विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. हे विधेयक केव्हापासून लागू होईल, याची घोषणा गृहमंत्रालयाकडून केली जाईल.

गेल्या आठवड्यात सोमवारी हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं. मागील दारातून दिल्लीतील सरकार चालवण्याच्या हेतूनंच केंद्र सरकारनं हे विधेयक आणल्याचा आपनं आरोप केला आहे. दुसरीकडे लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचंही आपनं म्हटलं आहे. काँग्रेस खासदारांनी विधेयकाला विरोध करत राज्यसभेतून सभात्याग केला होता. याच गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com