MI Vs. DC Live Updates : ४ गडी राखून दिल्लीचा मुंबईवर दणदणीत विजय
IPL च्या 15व्या हंगामाला सुरूवीत झाली आहे. यंदाच्या हंगामातील दुसरा सामना हा मुंबई (Mumabi Indians) विरूद्ध दिल्ली (Delhi Capitals) असा रंगणार आहे. दरम्यान IPL जरी काल(26-03-2022) सुरू झाली असली तरी मुंबईकरांसाठी आणि देशभरातील मुंबई आणि दिल्लीच्या चाहत्यांसाठी IPL ची खऱ्या अर्था सुरूवात ही आज (27-03-2022) होणार आहे.
दरम्यान, टॉस जिंकल्यानंतर दिल्लीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
संघाच्या 66 धावा असताना रोहीत शर्मा 41 धावांवर बाद झाला. दरम्यान, इशन किशनच्या तुफानी खेळीमुळे मुंबईचा संघ 19व्या षटकांती 5 बाद 159 अश्या अवस्थेत आहे. शेवटच्या षटकात 18 धावा करत मुंबईच्या संघाने 177 धावा करत दिल्लीसमोर 178 धावांचं तगडं लक्ष्य ठेवलं आहे.
18व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत अक्षर पटेलने पंजाबला विजय मिळवून दिला आहे. 178 धावांचं लक्ष्य दिल्लीच्या संघाने 6 गडी गमावून 18.2 षटकांत पुर्ण केलं आहे.