PM modi America Visit: अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय मायदेशी परतले, महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश

अमेरिकेतून 104 बेकायदा भारतीय स्थलांतरित मायदेशी परतले, महाराष्ट्रातील 3 जणांचा समावेश. पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यात स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित.
Published by :
Prachi Nate

अमेरिकेतून 104 बेकायदा स्थलांतरितांची भारतामध्ये पाठवणी करण्यात आली आहे. बुधवारी अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडल आहे. या स्थलांतरित लोकांमध्ये 30 पंजाबचे, हरियाणा तसेच 33 गुजरातचे आणि उत्तर प्रदेश तसेच चंडीगडचे 2 ते 3 स्थलांतरित आहेत.

यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com