US Plane Crash: अमेरिकेत विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची टक्कर, दुर्घटनेत १९ ठार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. हे प्रवासी विमान अमेरिकन सेनेच्या हेलिकॉप्टरला कोसळून हा अपघात झाला. या अपघातानंतर हे विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. त्यानंतर नदीतून जवळपास 19 मृतदेह काढण्यात आल्याचं कळतंय. विमानात जवळपास 60 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर होते अशी माहिती मिळत आहे. नदीतून १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं. कॅनडा एअरचं हे विमान होतं. अपघातानंतर रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाणं आणि लँडिंग थांबवण्यात आली होती.
पेंटागॉन आणि सैन्यदलाकडून या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिली आहे. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित करत झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
कसा घडला अपघात?
अमेरिकन एयरलाईन्सचे हे विमान कँन्सास येथून उड्डाण करून वॉशिंगटन डीसीच्या दिशेने जात होते. रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर हे विमान उतरणार होतं. रनवेवर लँडिंगच्या आधी सैन्याच्या हेलीकॉप्टरची या विमानाशी टक्कर झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान अचानक उजव्या बाजूला झुकू लागले. त्यानंतर विमानाला आग लागून विमान नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर या अपघातासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये विमान अपघात रोखता आला असता असे म्हटले आहे. तसेच कंट्रोल टॉवरच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.