देश-विदेश
America : अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार; एका विद्यार्थ्यासह 3 जण जखमी
गोळीबाराच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण
( America) अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली असून यामध्ये एका विद्यार्थ्यासह 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आहेत.
अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या निवासी सभागृहात रविवारी पहाटे ही अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कॅम्पसबाहेर काही लोक निवासी सभागृहात आले तेव्हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत असून यामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार नेमका का झाला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.