India Pakistan War
India Pakistan War

India Pakistan War: Raj Kumar Thapa : पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. (India Pakistan War)

पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.

याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानच्या गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा (Raj Kumar Thapa) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी शासकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com