Pahalgam Terror Attack : पर्यटकांना वाचवण्यासाठी धावला आदिल, दहशतवाद्यांनी त्यालाही घातल्या गोळ्या !
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यात अनेक निरपराध लोक मारले गेले. या हल्ल्यादरम्यान तेथील स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह हा इतरांचा जीव वाचवायला गेला आणि दहशदवाद्यांनी त्याला देखील गोळ्या झाडल्या. आदिल हा अतिशय गरीब कुटुंबातूनअसलेला एक सामान्य रहिवाशी होता. त्याच्या घरात तो एकटाच कमवणारा तरुण होता. तो पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करत होता.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान आदिल देखील घटनास्थळी होता. ज्यावेळी त्याला समजलं की, तिथे पर्यटकांवर गोळीबार होत आहे. त्यावेळी आदिल पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी दहशदवाद्यांसमोर भिडला. आदिल छातीचा कोट करुन दहशदवाद्यांसमोर उभा राहिला. इतकचं नव्हे तर दहशतवादी समोर आल्यानंतर आदिलनं एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हे धाडस दाखवत असताना दहशदवाद्यांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या आणि यातच आदिलचा मृत्यू झाला.
आदिलकडून पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न
आदिल हा पर्यटकांना कार पार्किंग पासून मैदानापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होता. आदिल त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबात वयस्कर आई वडील, पत्नी, मुलं आहे. त्याच्या पश्चात आदिलच्या कुटुंबीयांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. हल्ल्यादरम्यान मरण पावलेल्या आदिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आदिलच्या कुटुंबीयांचा माध्यमांशी संवाद
आदिलच्या कुटुंबीय माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "सय्यद आदिल हुसैन शाह हा तिथे घोडा चावण्यासाठी गेला होता. त्याच्या कामासंदर्भात तो तिथे गेला होता. आम्हाला तीनच्या सुमारास अस समजल की पहलगाम येथे दहशदवादी हल्ला सुरु झाला आहे. त्यामुळे आम्ही त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचा फोन बंद लागत होता. घरात सर्वात मोठा हाच होता. त्याचा फोन 4-4.40 वाजता सुरु झाला मात्र त्यावेळी कुणीच उत्तर दिलं नाही. आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार नोंदवली. तेव्हा आम्हाला त्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली. तसं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि पाहिलं तर तो तिथे जखमी अवस्थेत होता. ज्यांनी पण त्याच्यासोबत असं केलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याचा काही दोष नव्हता यामध्ये मगं त्याचा जीव का घेतला?", असा प्रश्न आदिलच्या घरातल्यांनी विचारलेला आहे.
नेमका कसा घडला पहगामध्ये दहशदवादी हल्ला
काल जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. तसेच यावेळी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यामुळे स्थानिक लोकांसह पर्यटकांनाही ते दहशतवादी असू शकतात असा कोणताच अंदाज आला नाही. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यादरम्यान पहलगाममध्ये महाराष्ट्रातील काही लोकांचा देखील सहभाग होता. जम्मू काश्मीर मधील दहशत वादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगर भागातील दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील मृतांची तसेच जखमींची नावे
अतुल मोने - डोंबिवली- मृत
संजय लेले - डोंबिवली- मृत
हेमंत जोशी- डोंबिवली- मृत
संतोष जगदाळे- पुणे- मृत
कौस्तुभ गणबोटे- पुणे- मृत
दिलीप देसले- पनवेल- मृत
एस बालचंद्रू- जखमी
सुबोध पाटील- जखमी
शोबीत पटे- जखमी