Airtel पाठोपाठ आता SpaceX ची Jio मध्येही गुंतवणूक, कोणत्या सेवा मिळणार? जाणून घ्या

Airtel पाठोपाठ आता SpaceX ची Jio मध्येही गुंतवणूक, कोणत्या सेवा मिळणार? जाणून घ्या

प्रत्येक भारतीयाला परवडणारे आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड ॲक्सेस देणे हे जिओचे प्राधान्य आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

एलन मस्क सध्या भारतातील आर्थिक गुंतवणुकीमुळे अधिक चर्चेत आहे. 11 मार्च रोजी एलन मस्कची मालकी असलेल्या SpaceX कंपनीने Airtel कंपनीशी हातमिळवणी केली. spaceX आणि Airtel मध्ये मोठा करार झाला. अशातच आता Jio आणि SpaceX यांच्यामध्ये करार झाल्याचेदेखील समोर आले आहे.

भारतात स्टारलिंकला मंजूरी मिळाल्यानंतर जिओ आणि एअरटेल स्पेस एक्स कंपनीच्या सेवा भारतात सुरु होतील. Airtel प्रमाणे, Jio देखील स्टारलिंक उत्पादने आपल्या रिटेल आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध करून देईल. रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंक डिव्हाइस जिओच्या भौतिक स्टोअरमध्ये उपलब्ध असतील आणि कंपनी इंस्टॉलेशन आणि सक्रिय करण्यासाठी ग्राहक सेवा देखील प्रदान करेल.

रिलायन्स जिओ ग्रुपचे सीईओ मॅथ्यू ओमन म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला परवडणारे आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड ॲक्सेस देणे हे जिओचे प्राधान्य आहे. SpaceX च्या भागीदारीत स्टारलिंक सेवा भारतात आणणे कंपनीची वचनबद्धता दर्शवते असेही सांगितले.

दरम्यान एअरटेल आणि स्पेसएक्स यांच्यामध्ये झालेल्या करारात भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु करण्यात येणार आहे. हा करार म्हणजे एलॉन मस्क यांची भारातील महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक असल्याचे म्हंटले आहे. यानंतर आता मस्क भारतात अन्य क्षेत्रातही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे असे म्हंटले जात आहे. या कराराच्या मदतीने एअरटेल आगामी काळात देशभरात विशेषत: ज्या भागात त्यांची सेवा पोहोचलेली नाही, तेथे स्वत:चा विस्तार करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com