Jammu Kashmir Attack : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार; गोळीबारात एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील कंडी भागात दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार केला गेला आहे.
Published by :
Prachi Nate

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशभरात संताप व्यक्त केला गेला. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला. अस असताना, शनिवारी रात्री जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

जम्मू काश्मीरमधील कंडी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी कंडी परिसरात राहणारे समाजसेवक गुलाम रसूल मगरे यांच्या घरी घुसून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मगरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुपवाड्यातील या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा दलाकडून या हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. तसेच या घटनेतील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com