Volodymyr Zelenskyy : व्लादिमिर पुतिन यांच्यानंतर आता झेलेन्स्की जानेवारीत भारत दोऱ्यावर येणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Volodymyr Zelenskyy ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे भारत दौरा आले होते. 4 आणि 5 डिसेंबरला असा 2 दिवस पुतीन यांचा भारत दौरा होता.
दोन दिवसांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यानंतर आता झेलेन्स्की हे जानेवारीत भारत दोऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या भारतभेटीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी नवी दिल्लीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असून जानेवारी 2026 मध्ये झेलेन्स्की आणि मोदींची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summery
पुतिनपाठोपाठ झेलेन्स्की जानेवारीत भारतभेटीवर?
राजकीय संतुलन साधण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न
जानेवारी 2026 मध्ये झेलेन्स्की-मोदींची भेट होण्याचा अंदाज
