Air India plane crash: Vijay Rupani: विजय रुपाणी यांच्यासाठी 'Lucky' नंबरच ठरला 'Unlucky'; काय आहे 'या' अंकाशी कनेक्शन?
(Vijay Rupani) अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघातात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही निधन झाले. विजय रूपाणी लंडनला निघाले होते. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान कोसळले.
विशेष म्हणजे, या अपघातानंतर एक विचित्र योगायोग चर्चेत आला आहे. रूपाणी यांचा ‘लकी नंबर’ 1206 होता, ज्याचा संदर्भ त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर देखील आढळतो. कालची तारीखदेखील होती 12/06/2025, म्हणजेच 1206. सोशल मीडियावर आता चर्चा सुरू आहे की ज्याला ते शुभ मानत होते, तोच नंबर त्यांच्या आयुष्यासाठी अशुभ ठरला.
रूपाणी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की ते अंकशास्त्रावर (Numerology) विश्वास ठेवत होते. त्यांच्या अनेक वाहनांवर 1206 हा क्रमांक स्पष्ट दिसतो. या विमान दुर्घटनेमुळे गुजरातसह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी रूपाणी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.