Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग ; अहमदाबाद अपघाताच्या एक दिवसानंतरची घटना
शुक्रवारी, थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI-379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अंदमान समुद्रावरून प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान फुकेट विमानतळावर परत आले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अहमदाबाद अपघाताच्या एक दिवसानंतर ही घटना घडली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लाईट AI-379 लँड केली असून आणि विमानतळ आपत्कालीन सेवेसोबत पुढील काम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी थाई बेट फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे बॉम्ब असल्याची धमकी मिळताच तातडीने विमानाचे लॅंडींग करण्यात आले आहे.
लँडिंगनंतर लगेचच, विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षिततेसाठी खाली उतरवण्यात आले. यासोबतच संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली जात आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता फुकेत विमानतळावरून दिल्लीसाठी विमानाने उड्डाण केले. परंतु अंदमान समुद्राजवळ धमक्या मिळाल्यानंतर ते परत उतरवावे लागले.