Elon Musk: "Elon Musk माझ्या मुलाचे पिता"; अमेरिकन Influencer चा एलोन मस्क यांवर गंभीर आरोप

इलॉन मस्क यांच्यावर अमेरिकन इन्फ्लूएन्सर अॅशले सेंट क्लेअर यांनी आरोप केला आहे की ते त्यांच्या मुलाचे पिता आहेत. या दाव्यामुळे इलॉन मस्क यांना 13 वे मुल असल्याची शक्यता आहे.
Published by :
Prachi Nate

इलॉन मस्क यांच्यावर एका अमेरिकन इन्फ्लूएन्सरने गंभीर आरोप केलेला आहे. इलॉन मस्क हे आपल्या मुलाचे पिता आहेत असा आरोप इलॉन मस्क यांच्यावर करण्यात आलेला आहे. अमेरिकन इन्फ्लूएन्सर अॅशले सेंट क्लेअर यांनी हा दावा केलेला आहे. मुलाच्या सुरक्षेच्या कारणामुळे आधी सांगितलं नाही असं देखील अॅशले सेंट क्लेअर यांनी म्हटलं आहे.

इलॉन मस्कला आधीच 12 मुले आहेत. अमेरिकन इन्फ्लूएन्सर अॅशले सेंट क्लेअर यांनी दावा केला आहे की, त्या टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या मुलाच्या आई आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला गुप्तपणे जन्म दिला पण सुरक्षितता आणि गोपनियतेमुळे ते आधीच जाहीर केलं नाही.

अॅशले सेंट क्लेअर यांनी यादरम्यान सोशल मीडियवर पोस्ट शेअर केली आहे. जर अॅशले सेंट क्लेअर यांचा दावा खरा असेल तर हे इलॉन मस्क यांचे 13 वे मुल असेल. इलॉन मस्क यांना 2 बायका आणि 3 गर्लफ्रेंड्स पासून 12 मुल असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com