Donald Trump On Iran-israel War : इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष

Donald Trump On Iran-israel War : इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची प्रतीक्षा; अमेरिका-इराण संघर्षात कोणती भूमिका घेणार?
Published by :
Shamal Sawant
Published on

इराण आणि इस्रायल यांच्यात प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संघर्षात अमेरिका कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या कोणताही अंतिम लष्करी निर्णय न घेता तो पुढील दोन आठवड्यांसाठी लांबवला असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

व्हाईट हाऊसकडून अधिकृत स्पष्टीकरण

व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, ट्रम्प सध्या इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईबाबत 'गंभीर विचार' करत आहेत, मात्र अद्याप अंतिम निर्णयावर पोहोचलेले नाहीत. या संदर्भात अमेरिकेतील राजकीय वातावरणातही गोंधळाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या बाजूने झुकणारी भूमिका घेतली आहे. त्यांच्या धोरणात्मक संकेतांवरून असे दिसते की, अमेरिका ही इस्रायलचे समर्थन करत असल्याचे समोर येत आहे. इराण–इस्रायल संघर्षाची व्याप्ती लक्षात घेता, अमेरिका कोणती भूमिका घेणार हे निर्णायक ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता असून, त्यानंतर परिस्थितीत आणखी उलथापालथ होऊ शकते.

अमेरिका– इस्रायल संबंध आणि लॉबी

इतिहासात गेले पाहिले, तर अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध हे खूपच मजबूत आहेत. अमेरिकेतील महत्त्वाच्या लॉबी इस्रायलच्या बाजूने कार्यरत असून, या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे धोरणही इस्रायलच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नागरी भागांवर हल्ले, मोठ्या प्रमाणावर नुकसान

इराण आणि इस्रायलमधील आक्रमणांचमुळे नागरी भागांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले आहे. हवाई सुरक्षा व्यवस्था भेदून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com