500 Rupees Note Ban : 500 च्या नोटा बंद होणार ? सरकारनेच केला खुलासा
गेल्या खूप दिवसापासून 500 रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे . रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2,000 रुपयांच्या नोटांप्रमाणे आता 500 रुपयांच्या नोटा सुद्धा बंद करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र असे असले तरी रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही अधिकृत निवेदन याबाबात जारी करण्यात आलेले नाही.
दोन वर्षांपूर्वी आरबीआयने 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकली. तसेच आता 500 रुपयांच्या नोटा काढण्याच्या विचारात आहे त्यामुळे आपल्या जवळील 500 रुपयांच्या नोटा लवकरात लवकर वापराव्या असा मेसेज गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती घेण्यासाठी प्रेस इन्फॉरमेशन ब्युरो (PIB) ने याबाबत माहिती काढली .त्यांनी काढलेल्या माहितीच्या आधारे हा मेसेज खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांच्या नोटांबाबत कोणताही अधिकृत संदेश जारी केलेला नाही. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय 500 रुपयांची नोट आपल्याला आता वापरता येणार आहे.500 रुपयांच्या नोटबंदीचा संदेश हा चुकीचा असून अश्या फसव्या मेसेजेस पासून लोकांनी सावध राहावे असे आवाहन प्रेस इन्फॉरमेशन ब्युरो यांनी नागरिकांना केले आहे. पैशांच्या बाबतीत कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट्चा वापर करावा, त्याचबरोबर कोणताही संशयास्पद मेसेज दिसल्यास त्वरीत त्याची तक्रार करावी अशी माहिती पीआयबीने दिली.
सध्या 500 रुपयाची नोट ही चलनात असून त्याच्या बंदीबाबत कोणतेही अधिकृत वृत्त सरकारतर्फे जारी करण्यात आलेले नाही.. पीआयबी ने याबाबत सत्यतेची पडताळणी केली.आणि हा संदेश खोटा ठरवला आहे. या अश्या फसव्या संदेशामुळे समाजमध्ये चुकीचा संदेश जात असून याबबाबत नागरिकांनी सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे. असे आवाहन सरकारने केले आहे.