Army officer Assaulted SpiceJet employees
Army officer Assaulted SpiceJet employees

Army officer Assaulted SpiceJet employees : स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला Video

स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याने हल्ला केला असल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Army officer Assaulted SpiceJet employees ) स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याने हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या ग्राउंड स्टाफवर लष्करातील लेफ्टनंट कर्नलने थेट हल्ला चढवत चौघांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ही घटना २६ जुलै रोजी घडली.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचे मणक्याचे हाड मोडले तसेच दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या जबड्यालाही दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे. विमानातून अतिरिक्त सामान नेण्यासाठी शुल्क मागितल्यावरून ही मारहाण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.लष्करी अधिकाऱ्याचा मारहाणीत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्पाइसजेटच्या एसजी-386 या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली. एअरलाइनने निवेदन जारी करून आरोपी लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाइंग लिस्टमध्ये टाकले आहे. स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले असून हल्ल्याची माहिती दिली आहे आणि प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com