नवनीत राणा यांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाल्या, "जनतेने त्यांना जागा दाखवली..."
दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला गेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्लीतीळ जनतेचे आभारदेखील मानले आहेत. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विजय साजरा केला.
दिल्लीमधील भाजपाच्या विजयानंतर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनीदेखील भाजपा व पंतप्राधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विरोधी पक्षावर टीकादेखील केली आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून अभिनंदन करते. दिल्लीच्या मतदारांचेदेखील अभिनंदन व आभार. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पक्षाचे खातंदेखील उघडलं नाही. तसेच जे खोट्याचे राजकारण करतात ते आपचे केजरीवाल यांचादेखील पराभव झाला आहे".
पुढे त्या म्हणाल्या की, "जे लोक रामाला मानत नाहीत, हिंदुत्वाला मानत नाहीत त्यांना लोक जागा दाखवतात. असं भाष्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे नवनीत यांची राहुल गांधी व केजरीवाल यांच्याबद्दची वक्तव्य चर्चेत आली आहेत.