Air India Plane Crash
Air India Plane Crash

Air India Plane Crash : बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार; विमान दुर्घटनेसंदर्भात करणार तपास

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं असून टेकऑफ करताना ही दुर्घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Air India Plane Crash )अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं असून टेकऑफ करताना ही दुर्घटना घडली. विमानाचं उड्डाण झालं आणि टेकऑफनंतर 10 मिनिटांतच विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात हा दुर्दैवी विमान अपघात झाला.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या (Air india) बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार आहे. एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली असून दुर्घटनेचे नेमकं कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेस देखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com