देश-विदेश
Kunal Kamra: कुणाल कामराला Book My Show चा मोठा धक्का ; शोचे प्रमोशनही थांबवले आणि...
या पत्रामध्ये कुणालचे सर्व शो हटवण्याची मागणी केली होती.
कुणाल कामराच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामराला मुंबईमध्ये आल्यास शिवसेना स्टाइलने स्वागत केले जाईल असा इशारा दिला होता. अशातच आता राहुल कनाल यांनी कुणाल कामराच्याबाबतीत Book My Showला पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये कुणालचे सर्व शो हटवण्याची मागणी केली होती. त्यावर आता नवीन माहिती समोर आली आहे.
कॉमेडियन कुणाल कामराची बुक माय शोवरून सर्व माहिती काढून टाकण्यात आली आहे. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी बुक माय शोच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पत्र लिहून कामराची माहिती काढण्याची आणि कलाकारांच्या इतिहासाच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुक माय शोनं कामराची सर्व माहिती आणि कलाकारांच्या इतिहासाच्या यादीतून काढल्याची माहिती समोर येत आहे.