Uttarakhand Accident
Uttarakhand Accident

Uttarakhand Accident : रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, दोघांचा मृत्यू, 10हून अधिक बेपत्ता

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात भीषण अपघात झाला
Published by :
Team Lokshahi
Published on

( Uttarakhand Accident ) उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात भीषण अपघात झाला. बद्रीनाथ मार्गावरून जात असलेली प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली. नियंत्रण सुटल्याने थेट अलकनंदा नदीत ही बस कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून किमान दहा प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनात एकूण 19 प्रवासी होते. 8 जणांना घटनास्थळी वाचवण्यात यश आलं असून इतर प्रवाशांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या बचाव पथकांनी कार्य सुरू केलं आहे.

हा अपघात घोलतीर गावाजवळ झाला असून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहन अचानक वळणावरून घसरून नदीत कोसळले. माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपासासाठी समिती स्थापन केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com